ग्रामपंचायत निकाल 2021: वणी, मारेगाव, झरी तालुका

LIVE UPDATE: कुणी मारली बाजी ?

0

वणी भाजप चे माजी जिल्हा सदस्य विजय पिदूरकर यांच्या पॅनलला हादरा.. 
वणी तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे संजय निखाडे यांच्या पॅनलचा 7 पैकी 6 जागांवर विजय

मोहदा ग्राम पंचायतमध्ये शिवसेनेचा सपडा साफ
सर्व 9 जागेवर समृद्धी परिवर्तन पॅनलचा ताबा

तालुक्यातील महत्वाची आणि औधोगिक क्षेत्र असलेली मोहदा ग्राम पंचायतीचे निकाल चौथ्या फेरीनंतर हाती लागले. मागील 15 वर्षांपासून शिवसेनेचे गौतम सुराणा यांच्या एकहाती असलेली ग्राम पंचायतवर मोठे उलटफेर होऊन समृद्धी परिवर्तन पॅनेलने झेंडा फडकवला आहे.

प्रभाग क्र. मध्ये समृद्धी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार गणेश बोन्डे, वर्षा राजूरकर अर्चना गेडाम विजयी झाले. प्रभाग क्र. 2 मधून सचिन रासेकर, शोभा टेकाम, सीमा ढुमणे तर प्रभाग क्र. 3 मधून बेबी उईके, मुक्ता मडावी आणि गजानन शेळवडे यांनी बाजी मारली. वर्तमान ग्राम पंचायत पॅनेलचे एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकले नाही.

……………..

ग्रामपंचायत पांढरकवडा (ल.)
ग्रामविकास परिवर्तन पॅनलने घडवले परिवर्तन…. सत्ताधा-यांचा पराभव
एकूण जागा 7
ग्रामविकास परिवर्तन पॅनल 4 जागा
विजयी: दुर्गा दत्तू पिंपळकर, माधुरी मंगेश विंचू, प्रगती संतोष चेरे, श्रीकांत कोईचाडे

गाव सर्वांगीण विकास आघाडी पॅनल – 3
विजयी: संगिता अनिल पोटे, प्रवीण खडसे, गजानन पुरुषोत्तम मडावी

मधूकर राजुरकर गणेश गेडेकर यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलने शिवसेनेचे चंद्रकांत घुगुल यांच्या गाव सर्वांगीण विकास पॅनलचा पराभव करता सत्तापालट केली आहे. लहान पांढरकवडा येथे 15 वर्षांपासून घुगुल यांच्या पॅनलची सत्ता होती.


वणीत मतमोजणीला सुरुवात

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी दिनांक 15 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी वणी तालुक्यात 74 ग्रामपंचायतीलासाठी 258 मतदान केंद्रावर मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजेपासून तहसिल कार्यालयाच्या महसूल भवन येथे मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

तालुक्यात 8 गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली आहे तर 74 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत सुमारे 1200 उमेदवार उभे होते. या सर्व उमेदवाराच्या भाग्याचा आज फैसला होणार आहे. चिखली, चनाखा, टुंड्रा , मुंगोली, गोवारी(पा), पेटुर, शेवाळा, निवली या गावात अविरोध निवडणूक झाली आहे. तर तालुक्यात राजूर, सुकणेगाव, नांदेपेरा, लालगुडा, घोन्सा, वांजरी, उकणी, पुनवट हे गाव संवेदनशील असून महत्त्वाचे आहे.

 

झरी तालुक्यात 36 ग्रामपंचायत करीता 615 उमेदवारांचे भाग्य मशीन बंद

★ 41 पैकी 5 ग्रामपंचायत व  4 गावातील 5 वॉर्ड अविरोध

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 41 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यातील 5 ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पडली. तर 36 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 36 पैकी मुकुटबन, अडेगाव, मांगली, अर्धवन येथील निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

झरी तालुक्यात 41 हजार 920 पैकी 30 हजार 907 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील दिग्रस, लिंगटी, येदलापूर, राजूर (गोटा) व अहेरअल्ली या गावात निवडणूक अविरोध झाली. तर झमकोला वॉर्ड क्र 3., वेडद वार्ड क्र 3,दाभाडी वार्ड क्र 3 व अडकोली येथील वॉर्ड क्र 3 इथे अविरोध निवड झाली.

संपूर्ण तालुक्याचा लाईव्ह निकाल याच लिंकवरून अपडेट केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.