प्रलंबित मागण्यांकरिता ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू
ग्रामपंचयातीचे कामे ठप्प तर जनतेचे हाल
सुशील ओझा, झरी: संपूर्ण राज्यात ग्रामसेवक संघटनेने विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात याकरिता २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले. या कामबंद आंदोलनाला राज्यातील विविध मतदारसंघातील आमदारांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन रजि,नं डीएनई १३६ शाखा झरीच्या वतीने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन दिले. आंदोलनाला पाठिंबा देऊन शासन स्तरावर समस्या निकाली काढण्याकरिता सहकार्य करण्याची मागणी युनियनने केली आहे.
ग्रामसेवकांच्या मागण्या ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारीपद रद्द करून फक्त पंचायत विकास अधिकारी पद मिळण्यात यावे. ग्रामसेवक संवर्गाचा प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करण्यात यावा. ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदल करून पदवीधर ग्रामसेवक म्हणून नेमणूक करावी. सन २०११च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी साजे व पदे वाढ करावे. ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतनत्रुटी दूर करण्यात यावी. सन २०१५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. आदर्श ग्रामसेवक राज्य व जिल्हास्तरावर आगाऊ वेतनवाढ करून एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करावे. सर्व ग्रामसेवकांकडील अतिरीक्त कामे कमी करण्यात यावीत. इत्यादी ग्रामसेवक कामबंद आंदोलनात करीत आहे. कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचयातचे अनेक कामे खोळंबलीत. गावकऱ्यांना इतर दाखल्याकरिता धावपळ करावी लागत आहे .
कामबंद आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष के. आर. जाधव, तालुका सचिव विजय उईके, आर. डी पाटील , गणेश मुके, संजय गिलबीले, प्रशांत डोनेकर, जगदीश गवारकर, शिर्तावार, बळीद, शेडमाके, वाढई, घाटोळे, कुडमथे, पोयाम, नैताम, अडपावार, धनगर, टाले, मेश्राम सहभागी होते.