रंगनाथ स्वामी पतसंस्थेतर्फे महामानवास अभिवादन

बाबासाहेबांच्या विचारांचं जतन हीच खरी आदरांजली - ऍड देविदास काळे

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी कडून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जगण्याच्या एक नवा दृष्टिकोन व दिशा देतात. आजच्या या दिवशी त्यांच्या विचारांचं जतन करून, त्यांचा अवलंब करून व इतरांपर्यंत पोहोचवणं हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरू शकते, असे मनोगत यावेळी ऍड देविदास काळे यांनी व्यक्त केले. यावेळी विवेकानंद मांडवकर उपाध्यक्ष, लिंगारेड्डी अंडेलवार संचालक, संजय दोरखंडे, सीईओ यांच्यासह मान्यवर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Podar School 2025

Comments are closed.