गुडीपाडवा मेळाव्यासाठी वणी तालुक्यातील हजारो मनसैनिक मुंबईत दाखल

मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा: राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष मनसे

जितेंद्र कोठारी, वणी: तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वणी तालुक्यातील शेकडो मनसे कार्यकर्ता व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात 7 वातानुकूलित स्लीपर बस व इतर खाजगी वाहनांमध्ये मनसे कार्यकर्ता शुक्रवारी मुंबईसाठी निघाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र करोनामुळे मागील दोन वर्षांत हा मेळावा होऊ शकला नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला जात आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे कडून हिंदुत्वाचा नवा अजेंडा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण विदर्भात वणी विधानसभाक्षेत्र हा मनसेचा गड मानला जातो. वणी उपविभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रभुत्व आहे याचे संपूर्ण श्रेय हे मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना जाते. राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात हजारो तरुणांनी मनसेचा झेंडा उचलून धरला आहे. हिंदू हृदयसम्राट राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक उत्स्फूर्तपणे शिवाजी पार्क येथे पोहचले आहे. दरम्यान राजू उंबरकर यांनी सर्व वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेस गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

Comments are closed.