मुकुटबन गुरुकुल कॉन्व्हेंट मधील इंग्रजी शिक्षक साबरे सन्मानित

स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश फॉर महाराष्ट्र राज्य यांनी केला सत्कार

0

सुशील ओझा, झरी: गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथील इंग्रजी शिक्षक तथा महाराष्ट्र राज्याचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आशीष साबरे यांचा गौरव झाला. स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश फॉर महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या व व्यवस्थापनाच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये यांच्या हस्तेसुद्धा सत्कार करण्यात आला.

Podar School 2025

स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंग्लिश फॉर महाराष्ट्र, रिजनल अकादमीक अथॉरिटी इंग्लिश एक्सपरटाइज, औरंगाबाद, महाराष्ट्र अकादमीक अथॉरिटी, पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे 2017 पासून ते 2020 या कालावधीत माध्यमिक (9ते10) इंग्रजी शिक्षकांसाठी चेस (कन्टीन्यूअस हेल्प टू टीचर्स ऑफ इंग्लिश फ्रॉम सेकंडरी स्कूल्स ) हा प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमासाठी गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन येथील इंग्रजी शिक्षक आशीष अशोक साबरे यांची शासनातर्फे तालुक्याचे इंग्रजी टीचर फोरमचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेच्या इंग्रजी शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य तज्ज्ञ मार्गदर्शक साबरे यांनी केले. यामध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन कशा प्रकारे केले जावे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी मध्ये संभाषण करण्यास योग्य ते मार्गदर्शन करणे, शाळेचे वातावरण इंग्रजीमय करणे, विविध शैक्षणिक कौशल्यांचा उपयोग करून इंग्रजी या विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यामध्ये गोडी निर्माण करणे.

तसेच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन परिणामकारक इंग्रजी विषयाचे अध्यापन करणे या गोष्टीचा समावेश होता. गेल्या तीन वर्षांपासून इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याचा उपक्रम चेस या नावाने प्रभावीपणे तालुक्यात सुरू आहे .माध्यमिक इंग्रजी शिक्षकांमध्ये या प्रशिक्षणामुळे उल्लेखनीय बदल झाल्याचे दिसून येते. तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रशिक्षणाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे विद्यार्थी.

आज आपल्याला इंग्रजीचे उत्तमरीत्या धडे गिरवताना दिसत आहे. त्यांची शैक्षणिक प्रगती होत आहे ही उल्लेखनिय बाब आहे. या अगोदर ही इंग्रजी विषयाचे अनेक प्रशिक्षण झाले. परंतु चेस प्रकलपांतर्गत मिळालेले प्रशिक्षण हे खूपच प्रभावी ठरले. असे शिक्षकांचे मत आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक आशीष साबरे यांना या प्रकल्पाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ, सुभाष कांबळे, रणजित देशमुख, नदीम, जिल्ह्याचे एम. इ. आर. जगताप, इंग्रजी विषय सहायक संग्राम दहिफळे यांचे मार्गदर्शन लाभले. साबरे यांनी या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान देऊन गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन या शाळेची ओळख महाराष्ट्र राज्यात अधोरेखित केली. साबरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीचे आभार मानले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.