बहुगुणी डेस्क, वणी: वणीत दिनांक 7 फेब्रुवारीला संस्कार माऊली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते 5 या वेळेत बाजोरीया हॉल, वरोरा रोड येथे हे शिबिर होत आहे. आनंदी जीवन कसे जगावे याविषयावर हे शिबिर आहे. ताराचंद बेलजी हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. या शिबिरात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.
जीवन जगताना आपणास दिवसभर उर्जेची गरज असते. परंतु उत्साही राहण्याकरिता आवश्यकतेपेक्षा अधिक कॅलरीज घेऊनही सायंकाळी आपण निरुत्साही होत असतो. आपल्या जीवनशैलीत काही त्रुटींमुळे उर्जेचा उपयोग योग्य होत नाही. अनेक वेळा सकारात्मक ऊर्जा आपल्या जवळ येतायेताच नकारात्मक ऊर्जेत बदलून जाते. आपल्या स्वयंपाक खोलीत काही बदलाची आवशकता आहे की ज्यामुळे आपण दिवसभर उर्जेने भरलेले राहू शकणार, व चांगली झोप घेऊ शकणार. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास या शिबिरात मिळणार आहेत.
ताराचंद बेलजी हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. ज्यांनी मागील दीड दशकापासून अध्ययन करून ऊर्जा विज्ञानाबाबत माहिती एकत्रीत केली आहे. यातील अनेक बाबी आपण आपल्या जीवनात पाहिल्यानदाच ऐकणार आहेत. जे फक्त एकूणच आपण स्वतःला आनंदी अनुभव कराल. या शिबिरात सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबाबत प्रात्यक्षिक करून दाखविल्या जाणार आहेत. अधिकाधिक लोकांनी आपल्या परिवारासह या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क गणेश चौधरी, 982341227 विलास क्षीरसागर 9822576064 सुरेश बाजोरिया, वाढई सर,