वणीत गुरुपौर्णिमा उत्सव आनंदात साजरा

विविध देखाव्यांनी जिंकले मन

0

विवेक तोटेवार, वणी; वणीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवात महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे साई बाबाची मिरवणूक असते. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता सदर मिरवणूक साई बाबा मंदिर यवतमाळ रोड येथून काढण्यात आली. संपूर्ण शहरातून विविध भागातून मार्गक्रमण करीत मिरवणूकीचा टिळक चौकात समारोप करण्यात आला.

मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. याच वेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु पावसामुळे भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमी आली नाही. टिळक चौक, शिवाजी चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगे बाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करीत सदर मिरवणूक टिळक चौकात समाप्त झाली. दरम्यान वणी शहरातील प्रत्येक चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक, वयोवृद्ध सर्व मोठया संख्येने उपस्थित होते. डी जे च्या तालावर नवयुवक थिरकत होते. मिरवणुकीत साई पालखी, साई बाबांची मूर्ती, पंजाबी बँड, कव्वाली चमू, फटाक्यांची अतिषबाजी प्रमुख आकर्षण होते. वणीत गेल्या अनेक वर्षांपासून साई सेवा समिती गुरुपौर्णिमा मिरवणुकीचे आयोजन करीत आहे. काही सामाजिक संघटनाही यात आता शामिल होत असल्याची माहिती आहे.

संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. यात वणी पोलिसांनी महत्वपूर्ण भूमीका बजावली. प्रत्येक चौकात व मिरवणूक जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.