हाडपक्या (मस्क-या) गणेशोत्सावानिमित्त जैन ले आऊट मध्ये जंगी कार्यक्रम

विविध स्पर्धा, जगराता, कीर्तन, आरोग्य शिबिर, सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैन ले आउट येथील मोरया गणेश उत्सव मंडळ (मस्क-या) तर्फे विविध उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर पासून हे कार्यक्रम सुरू होणार असून संपूर्ण 10 दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. यात विविध स्पर्धा, आरोग्य शिबिर, जगरात, किर्तन इत्यादींचा समावेश आहे. विशेष म्हणजे घेतल्या जाणा-या सर्व स्पर्धेचे बक्षिस लगेच जाहीर केले जाणार आहे. या सर्व उपक्रम व कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कऱण्यात आले आहे.

असे होणार विविध कार्यक्रम..
मंगळवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सं. 7 ते रा. 10 या वेळेत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी स्व. अजय विधाते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कऱण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 7 ते स. 10 पर्यंत होणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ. रोहित चोरडिया व डॉ. अस्मिता थाटे हे रुग्णांची तपासणी करणार आहे.

गुरुवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सं. 7 ते रात्री 10 पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यात हभप लक्ष्मणदास काळे, चांदूर रेल्वे अमरावती व ओम महाराज पाथरे बाल कीर्तनकार जवळा अमरावती हे सहभागी होणार आहे. शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत बॉल बकेट स्पर्धा तर शनिवारी रात्री 7 ऑक्टोबर रात्री 8 ते 10 वा. संगीत खुर्ची हा कार्यक्रम होणार आहे.

रविवारचे आकर्षण जगराता
रविवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी जय बजरंगी जागरण गृपद्वारा नागपूर येथील कोमल निनावे यांच्या जगरात्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा जगराता सं. 7 ते रात्री 11 पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाला हंसराज अहिर, संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जगरात्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी स्पेशल तळ्यात मळ्यात स्पर्धेचे आयोजन कऱण्यता आले आहे. ही स्पर्धा रा. 8 ते 10 या वेळेत होणार असून यात विजेत्या महिलांना पैठणी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. मंगळवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन कऱण्यात आले आहे. दिनांक 11 ऑक्टोबरला सं. 5 वा. सामान्य ज्ञान स्पर्धा तर रात्री 8 वाजता डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुरुवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दु. 4 वाजता विसर्जन सोहळा पार पडणार आहे.

Comments are closed.