वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो
24 तासात 20 मिमी पावसाची नोंद, शिंदोला विभागात सर्वाधिक पाऊस.... नदीनाले झाले ओव्हरफ्लो झाले असून नदीकाठच्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनचे पुनरागमन झाले आहे. वणी तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरणार असल्याचे बोलले जाते. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही उकड्यापासून सुटका मिळाली आहे. दरम्यान शुक्रवारी बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा नदी काठावरील सेलू, रांगणा, भुरकी व इतर गावातील नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
वणी तालुक्यात 21 जुलै रोजी सरासरी 19.55 मिलिमिटर तर आता पर्यंत 314.99 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात वणी, शिरपूर, पुनवट, गणेशपूर, भालर, कायर, शिंदोला, राजूर आणि रासा या 9 महसूल मंडळ मध्ये पावसाची नोंद झाली आहे. शिंदोला विभागात सर्वात जास्त 45 मीमी पाऊस पडल्याची माहिती आहे. येत्या 2-3 दिवस पुन्हा पाऊस येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
नदीनाले झाले ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना इशारा
तालुक्यातील सर्व नदी नाले ओसांडून वाहत आहे. निर्गडा व वर्धा नदीसह तालुक्यातील सर्वात मोठी नदी पैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. मात्र सध्या पूर परिस्थिती नसल्याची माहिती नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांनी दिली. उद्या शुक्रवारी बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा नदी काठावरील सेलू, रांगणा, भुरकी व इतर गावातील नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी ऑफिसकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
अतिरिक्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात, तलावात, शेततळे मध्ये शक्यतो मासेमारी करीता जाणे टाळावे. वहीवाटीच्या पुलावरून पाणी वाहत असतांना पुलावरचे पाणी ओसरे पर्यंत वाहनाने तसेच प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकीने रस्ता ओलाडंण्याचे धाडस करू नये. पालकांनी अल्पवयीन मुलांना मासेमारी, तलाव, धरण, तलाव इत्यादी ठिकाणी जावून पोहणे याकरीता प्रतिबंध पालावे. ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना व पूर परिस्थिती असतांना जावू नये. पाऊस सुरू असतांना सुरक्षीत स्थळी आश्रय घेण्यात यावा.
गावात पावसामुळे आपत्तीची परिस्थित आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग
जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, यवतमाळ
दुरध्वनी: 07232-240720/240844
फॅक्स: 07232-242211
ई मेल: [email protected] वेबसाईट http://www.yavatmal.nic.in
हे देखील वाचा:
बाजार करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले