मारेगाव चे ग्रामीण रुग्णालय जिह्लातील सर्वात दुर्दैवी रुग्णालय: खा. हंसराज अहीर

एक महिण्यात समस्या सोडवण्याचं दिलं आश्वासन

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयच जिल्ह्यातील सर्वात दुर्दैवी रुग्णालय असल्याचे मत खुद्द केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीत म्हटले आहे. या रुग्णालयातील रुग्णांना लवकरच चांगली सेवा मिळेल असं आश्वासनही त्यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली तसंच रुग्णांची चौकशी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून मारेगाव ग्रामीण रुग्णालया मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अभावी संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे. तालुक्यातील शंभराच्या वर गावातुन याच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येतात, परंतु येथे योग्य सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णाना आपला इलाज खासगी डॉक्टर कडून करावा लागत आहे. त्यामुळे गरीब जनतेचे आर्थिक नुकसान होत  आहे.

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना फवारणीच्या दरम्यान विषबाधा झाली अशा शेतकरी व शेतमजुरांना शासन स्तरावर  आर्थिक मदत मिळावी म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. हंसराज अहीर यांनी दिले.

अहिर यांची मारेगाव ग्रामीण रुग्णालयाला या महिन्यातील दूसरी भेट असून रुग्नालयातील समस्या जाणून घेऊन या समस्या एक महिन्यात पूर्ण करू असे आश्वासन दिले. या दरम्यान आरोग्य उपसंचालक अकोला जिल्हा शल्य चिकित्सक धोटे, वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावड़े जिल्हा सरचिटणीस, रमन डोये तालुका सरचिटणीस, डॉ माणिक ठाकरे जिल्हा सचिव, प्रशांत नांदे उपाध्यक्ष, न. प .गजानन कनाके नगरसेवक शोभा नक्षिणे महिला आघाडी भाजपा आदी उपस्थित होते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.