सेवानिवृत्त शिक्षक हरिप्रसाद पांडे यांचे वृद्धापकाळाने निधन
ना. तहसीलदार विवेक पांडे, ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे यांना पितृशोक
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक हरिप्रसाद पांडे यांचे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मारेगाव येथील आदर्श हायस्कूल येथे ते शिक्षक होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. यासह ते पत्रकार देखील होते. मारेगाव येथे पत्रकारितेचा पाया रचणा-या पत्रकारांपैकी ते एक होते. त्यांनी अनेक वर्ष लोकसत्ता सारख्या सुप्रसिद्ध दैनिकात काम केले. गेल्या काही वर्षांपासून ते त्यांचा मुलगा विवेक पांडे यांच्याकडे वणी येथे राहत होते. वृद्धापकाळामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होता. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा विवेक पांडे, ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे, प्रा. सतिश पांडे, पत्नी, मुलगी, जावई, नातंवड असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मारेगाव येथे सं. 5 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
Comments are closed.