हाथरस प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाचे निवेदन
जब्बार चीनी, वणी: हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार व बलात्कार प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी ही मागणी होत आहे. यासाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदन दिले. उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांसह हे निवेदन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले.
या निवेदनाद्वारे सदर गुन्हा योग्य त्या कायद्याखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून, आरोपींना त्वरित कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन सादर करताना राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे, वणी विभागीय अध्यक्ष रवी धुळे हजर होते.
संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणीच्या महिला सदस्य ज्योती येरेकर, चंदा गिरडकर, सोनी कुरील व सदस्य किशोर गिरडकर, किसन कोरडे, श्याम गिरडकर, राजू काकडे, किशोर हांडे, राजकुमार खोले, नितीन काकडे, विनोद ढेरे व आदी सदस्य हजर होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)