मुकुटबन येथे आरोग्य शिबिरात 3 हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी
मुकुटबनमध्ये ग्रामीण रुग्णालयासाठी राष्ट्रवादी करणार प्रयत्न
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. आदर्श शाळेत झालेल्या या आरोग्य शिबिरात 3 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. यात रुग्णांची वैद्यकिय चाचणी, रक्त तपासणी तसेच रोग आणि लक्षणांनुसार तपासणी करण्यात आली. रोग ऩिदानानंतर रुग्णांना मोफत औषधींचे वाटपही करण्यात आले. 50 पेक्षा अधिक विविध वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ, पॅथॉलॉजिस्ट इत्यादींनी रुग्णांची तपासणी केली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस झरी तालुक्यातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुकुटबन येथील आदर्श हायस्कूलमध्ये सकाळी 10 वाजता या शिबिराला सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजेपासूनच रुग्णांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या. रुग्णांची गर्दी याने शाळेला एका मेडिकल कॉलेजचे रूप आले होते. शिबिरात स्त्रीरोग, हृदयरोग, मधुमेह, बालरोग, अस्थीरोग, दंतरोग, नेत्ररोग, नाक कान घसा रोग, इत्यादी रोगांवर तपासणी व चाचणी करण्यात आली. सोबतच नेत्र आणि कानाच्या बहिरेपणावरही तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत मशीनचे वाटप करण्यात आले.
तपासणीआधी या शिबिराचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर डॉ. महेंद्र लोढा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंगजी गोहोकार, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर मानकर, संजय जंबे यांची उपस्थिती होती.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, डॉ. प्रेमानंद आवारी, डॉ. प्रीती लोढा, डॉ. वैद्य, डॉ. वीणा चवरडोल, आयुर्वेदाचार्य डॉ. राहुल खाडे, डॉ. विवेक गोफणे, सर्जरी तज्ज्ञ डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, हृद्यरोग व मधुमेहासाठी डॉ. गणेश लिमजे, डॉ. अनिरुद्ध वैद्य, डॉ. पाटील, जररल फिजिशियन डॉ. रमेश सपाट, डॉ. महेश सूर, डॉ. दिलीप सावनेरे, डॉ. नईम शेख.
भूलतज्ज्ञ डॉ. शिरीष कुमरवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील जुमनाके, डॉ. पवन राणे, डॉ. नीलेश ढुमणे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. विजय खापने, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुसळे, डॉ. मकरंद सपाट, डॉ. अमोल पदलमवार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार, डॉ. प्रीती खाडे, त्वचारोग तज्ज्ञ प्रशांत उरोडे, डॉ. पल्लवी पदलमवार, नाक कान घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, डॉ. पंकज शिंदे या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी आणि उपचार केले.
मुकुटबनला ग्रामीण रुग्णालय आणण्यासाठी प्रयत्न करणार
प्रास्ताविक करताना डॉ. महेंद्र लोढा यांनी झरी तालुका हा आदिवासी बहुल आहे. तालुक्यात ग्रामीण रुग्णालय नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे मुकुटबन येथे ग्रामीण रुग्णालय आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर शिबिराचे उद्धाटक आमदार ख्वाजा बेग यांनी झरी परिसरात असणाऱ्या कुपोषण, वन्यप्राण्यांचा हल्ला, सर्प विंचू इत्यादींच्या दंश यावर चिंता व्यक्त केली. तसेच परिसरात ग्रामीण रुग्णालय नसल्याने रुग्णांना वणीतील ग्रामीण रुग्णालयात यावे लागते. मात्र रुग्णालयाची क्षमता कमी व रुग्णांची संख्या जास्त असल्याने मुकुटबनला ग्रामीण रुग्णालय झालेच पाहिजे अशी भूमिका डॉ. लोढा यांच्या मागणीवर घेत जिल्हाच नाही तर राज्यपातळीवर डॉ. लोढा यांना जी मदत लागेल ती करण्यास तत्पर आहो असे वचन दिले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर मानकर, तालुका प्रमुख संजय जंबे यांच्यासह विशाल ठाकरे, अमोल ठाकरे, गजानन लकशेट्टीवार, संतोष बरडे, विशाल पारशीव, संदीप धवणे, अंकुश नेहारे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोढा हॉस्पिटल वणीची चमू यांनी परिश्रम घेतले.