शिंदोला येथील शिबिरात 600 हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

विजय चोरडिया यांचा स्तुत्य उपक्रम, पुढील शिबिर 27 जुलैला वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला येथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा पंचक्रोशीतील 600 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक रत्नकला मंगल कार्यालयात हे शिबिर झाले. स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन द्वारा व विजय चोरडिया यांनी या शिबिराचे आयोजन केले. शिबिर झाल्यानंतर लगेच यातील जवळपास 100 रुग्णांना सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

सकाळी 10 वाजता शिबिराचे उद्घाटन झाले. उद्घाटनाला फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, शांतीलाल जैन, डॉ. अमोल चौधरी, डॉ. रोहित चोरडिया यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथील तज्ज्ञ चमुनी रुग्णांची तपासणी केली. तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. तसेच चष्मा असलेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप होणार आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची होती, त्यांना सेवाग्राम येथे नेण्याची व्यवस्था फाउंडेशनने केली. शिबिरात सर्व रुग्णांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

पुढील शिबिर वणीत – विजय चोरडिया
4 जुलै रोजी मार्डी येथे भव्य आरोग्य शिबिर पार पडले. त्यानंतर शिंदोला येथे शिबिर झाले. आता पुढील शिबिर हे दिनांक 27 जुलै रोजी वणी येथील जैताई मंदिरात होणार आहे. या शिबिराचा परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा, अशी आग्रहाची विनंती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, चोरडिया हॉस्पिटल, वणी आणि कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या चमुनी परिश्रम घेतले.

 

Comments are closed.