रविवारी वणीत भव्य सुपरस्पेशालिटी महाआरोग्य शिबिर

मा. आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात शिबिराचे आयोजन

 

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी लोढा हॉस्पिटल वणी येथे भव्य सुपरस्पेशालिटी महाआरोग्य शिबिर होणार आहे. हे शिबिर दु. 1 ते सं. 5 या वेळेत होत आहे. या महाआरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी केली जाणार आहे. रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले जाणार आहे. हे शिबिर खा. प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात होत आहे. काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य डॉ. महेंद्र लोढा हे या शिबिराचे संयोजक आहे. या शिबिराचा वणी तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

सदर आरोग्य शिबिरात मेंदुरोग तज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप वरघने, मुत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण पंत व आनंद बैद, पोटविकार तज्ज्ञ डॉ. सागरा बोधरा, न्यरो व स्पाईन तज्ज्ञ डॉ. सुशील भोगावार व डॉ. अंकित डवरे, जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ डॉ. अंबर डवरे, वंधत्व व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद येरणे व डॉ. ऐश्वर्या डवरे यासह बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे वणी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोढा हॉस्पिटलची चमू परिश्रम घेत आहेत. शिबिरात मोठ्या संख्येने वणी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

Comments are closed.