सुशील ओझा, झरीः हा तालुका आदिवासीबहुल आहे. इथे विशेष आरोग्य सुविधा नाहीत. सामान्य व गरीब रुग्णांना वणी किंवा पांढरकवड्यााला जावं लागतं. म्हणूनच झरी तालुका राष्ट्रवादी काँगेसच पार्टीने प्रदेश सरचिटणीास डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात मोफत आरोग्य शिबिर घेतले. हे शिबिर झरी तालुक्यातील हिवरा बारसा येथील विठ्ठल मंदिरात नारायणराव बळवंतराव धवणे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले. प्रभाकर मानकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
डॉ. महेंद्र लोढा यांच्या नियोजनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महेेंद्र लोढा, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. शिरीष कुमरवार, डॉ. अनिरुद्ध वैद्य, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. विकास हेडाऊ, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. राहुल खाडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार जुमनाके, डॉ. पवन राणे, जनरल फिजिशियन डॉ. विवेक गोफणे, डॉ. नईम शेख, डॉ. पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल, सर्जरी तज्ज्ञ डॉ. किशोर व्यवहारे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुसळे, कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे यांनी रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केलेत.
या शिबिरात जवळपास 800 रुग्णांनी सहभाग घेतला. आवश्यक त्या रुग्णांची मोफत रक्ततपासणी या शिबिरात करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधी दिल्यात. ज्यांना कान, नाक व डोळ्यांची सर्जरी करणाऱ्या रुग्णांना 50 टक्के सवलत देण्यात आली. बळवंत देवलवार, सुभाष तांदूळकर, विलास नेल्लावार, पांडुरंग भुसेवार, शंकर चन्नावार, अनिल नाईक, भास्कर देवलवार, उकुंड मांढरे, श्याम मांढरे, अशोक पंचलेनवार, सखाराम बुच्चे, कर्जू आडे, दामू आत्राम, मधुकर मोरे,नामदेव कुळमेथे, बंडू आडे, अंकुश नेहारे कार्यकर्त्यांनी शिबिराच्या आयोजनाची व्यवस्था सांभाळली. परिसरातील अनेक खेड्यातील व पोडांतील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.