आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोना कार्याबाबत सत्कार

हंसराज अहिर यांची मुकुटबन आरोग्य केंद्राला भेट

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी 29 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील समस्या व रिक्त पदाबाबत माहिती घेतली. कमी कर्मचारी असताना सुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांच्या नेतृत्वात कोरोना काळात उल्लेखनीय कार्या केल्याबाबत डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या काळात अतिशय कमी संसाधने व सुविधा असतानाही जनतेला कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी सुविधा दिली. अशा लोकांचा सत्कार हे त्यांचे उत्साह वाढविण्याचे कार्य करतात असे प्रतिपादन अहिर यांनी केले. त्यानंतर अहिर यांनी माजी सरपंच शंकर लाकडे यांच्या घरी सांत्वन भेट दिली. शंकर लाकडे यांचे लहान बंधू सुनील लाकडे यांच्या मृत्यूबाबत त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केली.

यावेळी वणी विधानसभेचे असमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेश्वर गोंड्रावार, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, सरपंच मीना आरमुरवार, सतीश नाकले, मुन्ना बोलेनवार, डॉ मोहन गेडाम, अशोकरेड्डी बोदकुरवार व दत्तात्रय चिंतावार उपस्थीत होते.

हे देखील वाचा:

प्रॉपर्टीच्या वादातून पतीस पत्नी व मुलाची मारहाण

आज तालुक्यात कोरोनाचा अवघा एक रुग्ण

पोलिसांनी थांबवताच विनाकारण फिरणा-यांचे विचित्र कारणं

Leave A Reply

Your email address will not be published.