राष्ट्रवादीतर्फे आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

डॉ. महेंद्र लोढा यांचे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

0

विवेक तोटेवार, वणीः राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी वणीतील महावीर भवन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे 2 हजार लोकांनी आरोग्य तपासणी केली. यात विविध रोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना मोफत औषधीही देण्यात आली. हे आरोग्य शिबिर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी आयोजित केले होते.

सकाळी 11 वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमाला लोकांनी एकच गर्दी केली होती. केवळ वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातूनच नाही तर वरोरा आणि पांढरकवडा या तालुक्यातूनही तपासणीसाठी रुग्ण आले होते. सुमारे 2 हजार रुग्णांची तपासणी इथे करण्यात आली. आजपर्यंत वणीत झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरापेक्षा या शिबिरात आलेल्या रुग्णांची संख्या ही सर्वाधिक होती. तरी नियोजनात कोणतेही कसूर सुटली नाही. शिबिरात रुग्णांची तपासणी, रक्तगट तपासणी तर करण्यात आली. नाक, कान, घसा, हाड, पोट, मधुमेह, त्वचारोग, स्त्रीरोग इ. असा एकही आजार नव्हता ज्याची इथे तपासणी झाली नाही. सोबतच रुग्णांना मोफत औषधीही देण्यात आली.

या शिबिरात स्त्रीरोग तपासणी डॉ. महेंद्र लोढा, डॉ. प्रीती लोढा, डॉ. मनीषा जुमनाके, डॉ. वीण चवरडोल यांनी केली. तर हृदयरोग व मधुमेहांच्या रुग्णांची तपासणी डॉ. गणेश लिमजे, डॉ. जितेंद्र बोकडे यांनी केली. बालरोग तपासणी डॉ. सुनीलकुमार जुमनाके, डॉ. मनीष भगत यांनी केली. तर अस्थिरोग तपासणी डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. विकास हेडाऊ यांनी केली.

जनरल फिजिशियन डॉ. पाटील, डॉ. अनिरूद्ध वैद्य, सर्जरी विभागाचे डॉ. अशोक कोठारी, डॉ. किशोर व्यवहारे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुंधडा, डॉ. नीलू मुंदडा, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अमोल पदलमवार, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कमलाकर पोहे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी पदलमवार या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, संगीता खटोड, विजयाताई आगबत्तलवार, स्वप्नील धुर्वे, महेश पिदूरकर, अंकुश मापुर, सुर्यकांत खाडे, महादेव काकडे, हेमंत जोग, सिराज सिद्धीकी, रामकृष्ण वैद्य सह वणी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.