एकतानगर परिसरात खासगी प्लॉटवर घाणीचे साम्राज्य

नगरसेवकांचे दुर्लक्ष, नागरिकांचे मुख्याधिका-यांना निवेदन

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा विषाणूमुळे नागरिक चिंताग्रस्त असताना शहरातील एकतानगरच्या गल्लीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे भागातील नगरसेवक कानाडोळा करत असल्यामुळे वार्डातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

एकतानगर लगत येथील एका खुल्या प्लॉटवर टाकाऊ पदार्थ व वस्तू फेकल्या जात असून त्याच्या दुर्गधीमुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरील विक्रेते टाकावू साहित्य इथेच फेकून देतात. याचा परिणाम या परिसरात राहणा-या नागरिकाना भोगावा लागत आहे. सदर सडलेल्या दुर्गंधीयुक्त कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पाऊस पडल्याने या रस्त्यावरून जाताना नाकाला रुमाल लावून जाण्याशिवाय पर्याय नाही.

एकता नगर मधील कावडे, सावरकर यांच्या घरा जवळील कचरा व शाळा क्र. 2 च्या पटांगणात टाकलेला कचरा साफ करण्याबाबत एकता नगर येथील रहीवाशांनी नगर परिषद मुख्याधिका-यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर फारूक शेख, शुभम पेटकर, जुबेर खान, शबाना शेख, गणेश महाजनवार, अंकूश चव्हाण, संतोश आपटे आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.