मुसळधार पावसाने मारेगाव तालुक्यातील शेतकरी सुखावला

गुरुवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू

0

मारेगाव: पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी दुबार, तिबार पेरणीच्या चक्रव्युहात सापडला होता. मात्र गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

सुरवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याला दुबार पेरणीचा फटका बसला. त्यात तालुक्यात ३४ मीमी पाऊस पडल्याने जमिनीची उष्णता कमी न झाल्याने पेरणी केलेले बियाणे करपले. कृषी विभागाने तालुक्यात ६५% पेरणीझाल्यावर ६५ मिमी पडल्या शिवाय पेरणी करु नये अशी सूचना केली होती.

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तालुक्यात गावोगावी भजन, पूजन, गावभोजन करण्यात आले. मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली. अध्येमध्ये तुरळक पावसाने हजरी लावली. त्यामुळे बीज कसेतरी वाचले. परंतु गुरूवारी दि. ५ ला पावसाच्या दमदार पूनर्आगमनाने पिकाला जीवदान मिळाले आहे.

संततधार पावसाने जनावरांच्या चा-याचा प्रश्न काही प्रमाणात निकाली लागला आहे. तालुक्यातील नदी नाल्याची पातळी वाढली आहे. जरी पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी शेतकरी मात्र यामुळे चांगलाच सुखावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.