जड वाहनास प्रवेश बंदचा रोजच उडतो फज्जा

0

वणी/विवेक तोटेवार: वणीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. शहरात सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. परंतु रोजच बंदी असलेल्या वेळेत वाहन शहरात वाहन आणून त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

वणी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून प्रत्येक चौकात वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रत्येक चौकात कर्मचारी असताना अवजड वाहने शहरात दाखल होतात तरी कसे हे न उलगडणारे कोडे आहे. वाहतुकीवर नियंत्रित ठेवण्यासाठी वणी वाहतूक विभाग स्थापण्यात आला आहे. मात्र हा विभाग आता फक्त वसुली करताना दिसून येत आहे. असे अवजड वाहन आल्यानंतर त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून शांत बसण्याची जणू सवयच विभागास पडली आहे.

वणीत एकमार्गी वाहतुक आहे. रस्ते वाहतुकीसाठी मोठ्या वाहनांसाठी लहान असल्याने वाहतुकीची कोंडी होते. अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा उडणे नित्याचिच बाब आहे. परंतु याचे वाहतूक विभागाला काहीही देणे घेणे नाही असेच दिसत आहे.

ही आजची समस्या नाही तर गांधी चौकातील तुषार बारजवल नेहमीच अशी कोंडी होतांना दिसून येते. यावर वाहतूक प्रशासन आता कार्यवाही करणार काय? ती केव्हा करणार याकडे सर्व वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.