वणीत पूरग्रस्तांसाठी मदतीची हाक

11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत करता येणार साहित्य दान

0

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पश्मिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक फटका बसला. पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा हात येत असताना आता वणीकरही मदतीसाठी धावले आहेत. रोटरी क्लब आणि व्यापारी असोशिएशन या संघटनांनी पुढाकार घेऊन वणीकरांना मदत करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. रविवार दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान वणीकरांकडून टिळक चौक येथे मदत संकलन केंद्रात मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 16 ऑगस्टला ही मदत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पोहचती केली जाणार आहे.

पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक लोकांना या पुरात जीवही गमवावा लागला आहे. तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहे. यात शेती तर वाहून गेली सोबतच जनावरं ही वाहून गेले. पुरामुळे लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. सध्या पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे वणीत उद्यापासून टिळक चौकातील सत्यम हॉटेलच्या बाजूला रोटरी क्लब द्वारा मदत केंद्र सुरू केले जाणार आहे.

काय करता येणार मदत?
यात लोकांना वस्तू रुपात मदत करता येणार आहे. यात धान्य, साखर, चहापत्ती, दुध पावडर, तेल, बॅटरी, मेनबत्ती, साबन, टुथ पेस्ट, टुथ ब्रश, प्लेट, डिटर्जन्ट पावडर, ब्लँकेट, चादर, शाल, चटई, बेडसिट, मच्छरदाणी, ग्लुकोज – इलेक्ट्रॉल पावडर, लहान मुलांचे कपडे, सॅनिटरी नॅपकिन, नवीन कपडे व अंतर्वस्त्र, स्वेटर, यासोबत कोणत्याही प्रकारचा किराणा माल मदत रुपात देता येणार आहे.

गोळा झालेला सर्व माल 16 ऑगस्टला टिळक चौकातून पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल उत्तरवार -9822029203, निकेत गुप्ता – 9822940858, निखिल केडिया – 9422165890, सुधीर साळी – 9823027896, ऍड. नीलेश चौधरी – 9823277096, संदीप जयस्वाल – 9545166866 यांना संपर्क साधण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएशन वणी तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.