सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल 28 जानेवारीला

हेल्पिंग हँड गृपतर्फे घेण्यात आली होती स्पर्धा

0

निकेश जिलठे, वणी: हेल्पिंग हँड ग्रुपच्या वतीने येत्या 14 जानेवारी रविवारी यात्रा मैदानातील हनुमान मंदिरात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 700 पेक्षा जास्त मुलांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल 28 जानेवारीला लागणार आहे. सकाळी 9 वाजता वणीतील हनुमान मंदिर जत्रा मैदान येथे निकाल जाहीर करण्यात येईल. हा कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

ही सामान्य ज्ञान स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. पहिला गट हा वर्ग 5 ते 10 साठी होता. तर दुसरा गट हा खुला होता. अ  गटात सुमारे 600 च्या वर मुलांनी सहभाग घेतला होता. या गटातील स्पर्धा रंगनाथ स्वामी मंदिरात घेण्यात आली होती. तसंच अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंग विद्यालय लालगुडा येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. तर ग्रामीण भागात पेटुर, निंबाळा या शाळेत घेण्यात आली. या गटात प्रथम बक्षीस 3000/- रुपये, दुसरे बक्षीस 2000/- रुपये आहे. तर खुल्या गटात सुमारे 100 जणांनी सहभाग घेतला होता. ब गटात प्रथम बक्षीस 3000/- रुपये आहे.

हेल्पिंग हॅन्ड हा गृप एक सामाजिक उपक्रम राबवणारा गृप असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा गृप वणी आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवतो. मोफत, कोचिंग, गरजु मुलांना वह्या पुस्तके वाटणे, स्पर्धा परीक्षा इत्यादी उपक्रम या गृप तर्फे राबवण्यात आलेले आहे. सामान्या ज्ञान स्पर्धेच्या निकालाबाबत अधिक माहितीसाठी 9730292827 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.