कोंबड बाजारावर धाड, 7 जुगारी अटकेत

एलसीबीची कारवाई, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोडपाखिंडी लगतच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत सात जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून २ लाख २५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

गंगाधर अय्या आत्राम रा. मांडवा, जीवन सुनील मानकर रा. कोडपाखिंडी, अनिल रामचंद्र पावडे रा. लहान पांढरकवडा, भीमराव धर्माजी पेंदोर रा. टेंभी, शंकर विठ्ठल आकुलवार रा मांडवा, शंकर सूर्यभान बोपाटे रा. मार्की, लक्ष्मण रामा आत्राम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याजवळून रोख १८ हजार ७८० रुपये, चार कोंबडे, चार लोखंडी काती तसेच सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे हजर असताना कोडपाखिंडीच्या जंगलात कोंबड बाजार सुरू असल्याची गोपनीय सायंकाळी एलसीबीच्या पथकाने धाड टाकली.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे। शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, पाटणचे ठाणेदार संदीप पाटील, पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी यशस्विरित्या पार पाडली.

दारू पिल्यानंतर ‘तू मेरा भाई है’ डॉयलॉग मारल्याने मारहाण

वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Comments are closed.