पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांच्या या ओळी मराठी मनाला आजही सुखावतात. सरकारने राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यावर मनसेने कडाडून विरोध केला. अखेर आज राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीवर माघार घेतली. शालेय शिक्षण मंत्री यांनी विधानसभेत तशी घोषणा केली. त्यानुसार, हिंदी आता राज्यातील शाळांमध्ये अनिवार्य भाषा नसेल. राज्य सरकारने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. या निर्णयाचे स्वागत करत वणी मनसेने जल्लोषासह आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षण क्षेत्रात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “हिंदू आहोत, हिंदी नाही” अशी गर्जना केली. सरकारच्या हिंदी धोरणाला कडाडून विरोध केला होता. विद्यार्थ्यांवर भाषेचा अतिरिक्त भार पडला, तर मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळेल. त्यामुळे मराठीचे पतन होईल अशी भूमिका मनसेने घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर नमते घेत हा निर्णय स्थगित केला आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा विजय झाल्याचं मनसेचं म्हणणं आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. चौकात फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. मराठी भाषा, मनसे व राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्यात. संपूर्ण वातावरण मराठीमय करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आरोग्य सभापती धनजंय त्रिंबके, माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, शहर उपाध्यक्ष मयूर घाटोळे, मयूर गेडाम, अमोल मसेवार, शंकर पिंपळकर, गोविंद थेरे, परशुराम खंडाळकर, विलन बोदाडकर, रमेश पेचे, दिलीप मस्के, विठ्ठल हेपट, हिरा गोहोकार, मनोज नवघरे, सूरज काकडे, संकेत पारखी, धीरज बगवा, विजय चोखरे, अमित बोंडे, सतीश आवारी, जुबेर खान, प्रवीण कळसकर, अमर पाचभाई, कृष्णा कुकडेजा, योगेश काळे, अक्षय मसेवार, योगेश काळे, रमेश हेकारे यांच्यासह शहरातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.