मुकुटबन येथे होमगार्डची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 25 ऑक्टो रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. अविनाश रमेश क्षीरसागर (30) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक होमगार्ड म्हणून मुकुटबन पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार बेघर वस्तीमधील राहणारे अविनाश याला दारूची सवयी होती. रविवार 24 ऑक्टोबरला रात्री अविनाशने दारूच्या नशेत घरी आल्यामुळे आई व पत्नी सोबत जोरदार भांडण झाले. भांडणाला कंटाळून आई व पत्नीने बेघर बस्तीतच राहणारे अविनाशच्या लहान भावाच्या घरी रात्र काढली. सकाळी 8 वाजता दरम्यान अविनाशची पत्नी घरी आली असता तिला अविनाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी झरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतक अविनाश क्षीरसागरच्या मागे आई, पत्नी व लहान मुलगी आहे. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे कळू शकले नाही. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे. 

Comments are closed.