पोलीस पाटलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

भास्कर राऊत मारेगाव – येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समितीतर्फे पोलीस पाटलांकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी, जेष्ठ विधिद्य परवेज पठाण ,माजी जिल्हा उपशिक्षणाधिकारी साबीर शेख ,माजी मुख्याध्यापक विठ्ठल गजभिये उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथीनि तालुक्यातील पोलीस पाटलांना विविध कायदेशीर बाबीवर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ऍड मेहमूद पठाण यांनी तर आभार प्रदर्शन ऍड करिष्मा किन्हेकार यांनी केले. कार्यक्रमास ऍड आशिष पाटील ,ऍड नलिनी कोडापे, ऍड काजल शेख, ऍड भाग्यश्री बदखल, ऍड मेघा कोडापे यांचेसह न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.

Comments are closed.