सुशील ओझा, झरी: 1 एप्रिलला मांडवी जंगलात सापडलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटली आहे. मृतकाचे नाव नामदेव बाजीराव मडावी वय ६५ वर्ष असून त्यांच्याबाबत घरी न परतल्याने हरवल्याची तक्रार पाटण पोलीस स्टेशनला २६ फेब्रुवारी रोजी देण्यात आली होती. एक महिना लोटूनही सदर वयोवृद्ध इसम आढळून आला नव्हता.
१ एप्रिल रोज वनरक्षक अशोक कुडमेथे हे मांगुर्ला जंगल शिवारात गस्त घालत असताना त्यांना कुजलेल्या अवस्थेत मानवाच्या हाडाचा सांगाडा आढळून आला. वनरक्षक कुडमेथे यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला सांगाळा दिसल्याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग तक्रारीच्या आधारे मडावी यांच्या पुत्राला ओळख करिता घटनास्थळी घेऊन गेले.
मृतक इसमाजवळील हाडे, कपडे, केस, कुऱ्हाड व माळ वरून मृकाच्या मुलाने ओळखले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतकाला जंगलातील वन्य प्राण्यांनी हल्ला करून ठार मारल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने व पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रवीण ताडकोकुलवार राम गडदे करीत आहे.