खळबळजनक: जत्रा मैदानाजवळ आढळले शेकडो गायींचे शीर

शहरात उडाली एकच खळबळ, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: शहरातील जत्रा मैदान रोडवर शेकडो मृत गायीचे शीर आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती होताच शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी हजारो लोकांची गर्दी घटनास्थळी जमा झाली होती. घटनेची माहिती होताच विविध संघटनेद्वारे याचा निषेध करून त्यांनी आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ठाणेदार अनिल बेहराणी यांनी या प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे वचन घटनास्थळी जमलेल्या संतप्त उपस्थितांना दिली.

प्राप्त माहितीनुसार, वणीतील जत्रा मैदान रोड (लालगुडा रोड) येथे मांस विक्रीचे दुकाने आहेत. आज शनिवारी दिनाक 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास चौपाटी बार समोर रस्त्याच्या कडेला ये-जा करणा-या काही तरुणांना दोन गायींचे शीर आढळून आले. हे तरुण या शिरासोबत सेल्फी घेत होते. दरम्यान तिथे जमलेली गर्दी व सेल्फी घेत असताना पाहून रस्त्यावरून जाणारे लोक तिथे थांबले.

काही वेळातच याचे व्हिडिओ याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. शिवसेना, बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाल. दरम्यान वणी पोलिसांना देखील याची माहिती मिळाली. एचडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहराणी हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी जमा झाली होती.

असे आढळले शेकडो शीर…
रस्त्यावर दोन गायींचे शीर आढळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील जागेचा शोध घेतला. दरम्यान त्यांना एका झोपडीत शेकडो गाईंचे शीर आढळले. गायीचे शीर विकले जात नाही. मात्र त्याचे हाडे विकले जातात. अशी माहिती ‘वणी बहुगुणी’ ला मिळाली. त्यामुळे हे शीर एका झोपडीत ठेवल्याचा अंदाज बांधला जात आहे.

घटनेची माहिती होताच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून याचा निषेध केला जात आहे. राम नवमी उत्सव समितीचे रवी बेलूरकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शासन कराने, अशी मागणी त्यांनी केली. वृत्त लिहीपर्यंत पर्यंत पोलीस प्रशासनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गायींची कत्तल कुणी केली? कोण आहेत आरोपी? गोवंश हत्या कायदा राज्यात लागू असताना राजरोसपणे गायींचे शीर भर रस्त्यात फेकण्याची कुणाची हिम्मत झाली याची सर्वत्र चर्चा होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.