डोंगरगाव (दहेगाव) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किसान सभेचे आमरण उपोषण

जि.प. बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

0

वणी: वणी तालुक्यातील डोंगरगाव (दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसंच मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ताही पूर्णतः उखडला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहे. याविषयी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं अखेर डोंगरगाव आणि वेगाव येथील ग्रामस्थांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

उपोषणकर्त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरुद्ध एल्गार पुकारत तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात किसान सभेचे दिलीप परचाके, किशोर बांदूरकर, बापूजी लोणगाडगे, पांडुरंग मिलमिले, सुहास हिंगाने, पंढरी येटी, विनोद रोगे आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.

(वॉव… आता फुकटात करता येणार विमान प्रवास !)

डोंगरगाव आणि वेगाव जाणा-या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहे. सायकल अथवा दुचाकी नेणे ही कठीण झाले आहे. रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे असल्याने वाहने सुद्धा जात नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. उखडलेल्या रस्त्यावरील खड्यात पाणी साचले आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि एखाद्या रुग्णाला शहरात जायचे म्हटलं तर तारेवरची कसरत करावी लागत आहे.

डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था

याबाबत डोंगरगावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागील महिन्यात निवेदन देऊन समस्यांचा पाढा वाचला होता. संबंधित उपअभियंता भालशंकर यांनी 30 जून पर्यंत रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र संबंधित अभियंत्यांनी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका बघून वेळकाढू धोरण अवलंबिलं होतं. अखेर डोंगरगाव आणि वेगावच्या रहिवाशांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.