वणीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी, रॅलीने वेधले लक्ष

क्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद, झिया अहमद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

विवेक तोटेवार, वणी: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 171 रक्तदात्यांनी केले. यात अनेक महिलांचाही समावेश होता.

सकाळी मदरसा ए गरीब नवाज मोमीनपुरा वणी, रजा कमिटी पंचशील नगर, ख्वाजा नगर कमेटी लालपुलिया या सर्व संघटनेच्या रॅली मोमीनपुरा येथे येऊन मिळाल्या. त्यानंतर सकाळी 9 वाजता भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली इंदिरा चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक, अणे चौक, गांधी चौक, काठेड ऑइल मिल, दीपक चौपाटी असा प्रवास करत मोमीनपुरा येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी यंग मुस्लीम कमेटी मोमीनपुरा, रिजविन फैजन ए बरकात यांच्याकडून मुस्लिम विषयक धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे आयोजन
जमात ए इस्लामी हिंद या संघटनेकडून टिळक चौकात सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी केले. यावेळी वणीचे ठाणेदार अजित जाधव यांनीही शिबिराला भेट दिली. या शिबिरात एकूण 171 जणांनी रक्तदान केले. यात 30 महिलांचा समावेश होता. पहिल्यांदाच रक्तदान शिबिरात एवढ्या मोठी संख्या दिसून आली. लाईफ लाइन ब्लड बँक यांच्या सहकार्यातून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

झिया अहमद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी गाडगे बाबा अमरावती विधापीठ येथे सिनेट सदस्य म्हणून निवड झालेले गजानन कसावार व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले नगर पालिका उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक जाहिद खलील यांचा सत्कार केला गेला. तसेच सामाजिक कार्यकर्ते झिया अहमद यांच्या “महात्मा फुले आणि इस्लाम” या पुस्तकाचे एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

जमात ए इस्लामी हिन्द वणी ही संघटना गेल्या 9 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरशद शाह, डॉ. सय्यद अतीक, आरिफ खान, अब्दुल कय्यूम, झिया अहमद, हाफ़िज़ सलीम अंसारी, सय्यद यूनुस, सलीम शेख, सादिक शेख, जमीर शेख इत्यादींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा: 

Breaking – उभ्या ट्रकवर मागून आदळली ट्रॅव्हल्स, 25 प्रवासी जखमी

Comments are closed.