Breaking – उभ्या ट्रकवर मागून आदळली ट्रॅव्हल्स, 25 प्रवासी जखमी

यवतमाळ वणी मार्गावर गौराळा जवळ भीषण अपघात अपघात

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ वणी मार्गावर मारेगाव पासून काही अंतरावर भरधाव ट्रॅव्हल्स बस उभ्या ट्रकवर मागून आदळली. गुरुवार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडलेल्या या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स बस मधील 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर बसच्या केबिनमध्ये अडकलेल्या एका महिलेला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील भाविक चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे देव दर्शनासाठी निघाले होते. त्यासाठी त्यांनी अकोला येथील हमसफर ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MH27A9994 भाडयाने केली होती. यवतमाळ वणी मार्गावर रात्री 9 वाजता ही बस गौराळा गावाजवळ पोहचली असता रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेला हायवा ट्रक क्रमांक MH34 W 9909 ला ट्रॅव्हल्स बसने मागून जोरदार धडक दिली. 

या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स मधील 25 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमी एका महिलेला वणी येथे पाठविण्यात आले. ट्रॅव्हल्स बसमध्ये 49 भाविक प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र त्यापूर्वी नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाश्यांना मारेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

टिप्परचे इंडिकेटर बंद असल्यामुळे घडला अपघात

मारेगाव वणी मार्गावर गौराळा फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या हायवा ट्रक क्रमांक MH 34 W 9909 चे सर्व इंडिकेटर बंद होते. तसेच ट्रकला मागून रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टी सुद्धा लावून नव्हती त्यामुळे ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला समोरून येणाऱ्या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे ट्रक दिसून पडला नाही. आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. 

Comments are closed.