अवैध दारूविक्रीविरोधात कुरईवासियांचा एल्गार

पोलिसांवर हफ्ते घेतल्याचा ग्रामवासियांचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुरई गावात खूप मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. परंतु शिरपूर पोलीस ठाणे आर्थिक व्यवहार करून गप्प बसले आहे. असा आरोप करत कुरईवासीयांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी ही मागणी घेऊन वणीतील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सोमवारी निवेदन दिले.

वणी तालुक्यातील कुरई या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. गावकऱ्यांनी विरोध करताच त्यांना जीवे मारण्याची व प्रसंगी प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहे. 2011 साली मार्च महिन्यात असाच प्रकारचा हल्ला कुरई गावातील एका व्यक्तीवर करण्यात आला. पोलिसात तक्रार दिल्यानंतर मारेकऱ्यांना 6 महिन्याची शिक्षा झाली. परंतु तुरुंगातून बाहेर येताच मारेकऱ्यांना अवैध दारूचा व्यवसाय सुरू केला. गावत दहशत निर्माण केल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण आहे.

2017 साली या अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध शिरपूर पोलिसांना तक्रार देण्यात आली. वणीतील उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. परंतु कारवाई मात्र झाली नाही. त्यांना सत्ताधाऱ्यांचा व पोलीसांची साथ असल्याने हा व्यवसाय जोमात सुरू आहे. असा आरोप कुरईवासीयांनी केला आहे. कुरईमध्ये दत्ता येरगुडे व ग्रामवासी यांनी दारूविक्रेत्यांच्या नावे सांगितली गावकर्यांनी दारूविक्रेत्यांची नावे सांगूनही पोलीस कार्यवाही का करत नाही असा प्रश्न कुरईवासीयांनी उपस्थित केला आहे.

ग्राम सदस्य दत्ता येरगुडे यांनी वणी बहुगुणीशी बोलतांना पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यांनी आरोप केला आहे की कुरई येथून पोलिसांना 2 लाख रुपये हफ्ता मिळतो. त्यामुळे पोलीस कारवाई करीत नाही. कुरई गावातून रोज 4 गाड्या अवैध दारू चंद्रपूर जिल्ह्यात पोहचविल्या जाते. वणीतून दारू आणून ती गावातील गोदामात ठेवली जाते व तेथून तिची विल्हेवाट लावल्या जाते. यात पोलीस प्रशासन व सत्ताधारी त्यांची मदत करीत आहे. पोलीस हे आता रक्षक नाही तर भक्षक बनले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

कुरईवासी आधी शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले असता ते गाडीत बसून निघून गेले. अशा वेळी ग्रामवासीयांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन संताप व्यक्त केला. याप्रसंगी गावातील महिला व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. पोलीस प्रशासन या मुजोर दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.