सुशील ओझा, झरी: संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त सर्वच दुकाने बियरबार देशी दारूची दुकाने व वाईनशॉप बंद करण्यात आले. ज्यामुळे मद्यपी लोकांचे मोठे हाल झाले. सध्या 52 रुपयांचा पव्याची 150 ते 200 रुपये प्रमाणे विक्री सुरू आहे. तर 200 ची इंग्लिश दारुची 350 ते 400 रुपये प्रमाणे सुरू असल्याची माहिती आहे. परंतु अवैध दारू विक्रेत्यांचा साठा संपल्यानंतर मुकूटबन व झरी येथील बहुतांश देशी दारू दुकान व बियरबार मधून छुप्या रितीने देशी दारू व इंग्लिश दारूची विक्री होत असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील सर्वच बियरबार व देशी दारू दुकानाला सील लावण्यात आले होते. सील लावण्यापूर्वी अबकारी विभागाला शिल्लक असलेल्या दारू साठा व विक्रीची माहिती घेऊन सील लावावे लागते. परंतु काही दारू दुकानदारांनी सेलिंग जास्त दाखवून उर्वरित दारूसाठा दुकानाच्या बाहेर किंवा गोडाऊन मध्ये ठेवला. त्यानंतर तीच दारू जास्त दराने विक्री करून लाखो रुपयांची करत असल्याची माहिती आहे.
लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास दीड महिना होत असून अजूनही देशी व इंग्लिश दारूची विक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अबकारी विभाकडून बियरबार व देशी दारूच्या दुकानाला समोरच्या गेटला सील लावण्यात आले आहे तर मागचे गेट खुले आहे ज्यामुळे मागील गेटने दारूचे बंपर शिष्या तसेच थंडी बियर सुद्धा घरपोच मिळत आहे. तर काही दुकानातून सील लावलेले असून सुद्धा सील काढून दारूची विक्री केली जात आहे. दुकानाला सील लावल्यानंतर दारू दुकानदार दारूच्या पेट्या काढून कसा विक्री करतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपूर्ण जिल्ह्यात कुठे दारू मिळत नसेल परंतु झरी तालुक्यातील काही बियरबार व देशी दारू दुकानदारांकडून अजूनही सर्वच प्रकारचे दारू व बियर मिळत आहे. मुकूटबन ते पाटण व वणी मार्गावरील दोन्ही पेट्रोल पंपापर्यत सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत दारू करिता रांगा पहायला मिळत आहे. बारचालकांच्या जवळील व दररोज बारमध्ये बसून पिणाऱ्या ग्राहकाला घरपोच दारूच्या बंपर शिष्या व बियर पोहचविल्या जात आहे. एक महिन्यापासून दारू दुकाने बंद असताना अजूनही एवढी दारू सील लावल्यानंतर मिळत आहे. तर एवढ्या प्रमाणात दारू आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती नुसार तालुक्यातील अनेक बार व देशी दारू दुकानदारांना अबकारी विभागातील एका कर्मचाऱ्यांने 15 ते 20 हजार रुपये घेऊन मेणबत्ती व सील करण्याचे साधन दिल्याची माहिती आहे. ज्यामुळे बियरबार चालक व देशी दारू दुकानदार याचा उपयोग घेऊन सील तोडून दारूच्या पेट्या काढून विक्रीत करीत असल्याची माहिती काही दुकानदारांच्या तोंडून ऐकला मिळाली आहे. दुकानातील साठा चेक केल्यास या गोष्टीतील तथ्य समोर येऊ शकते.
यवतमाळ येथील कर्मचा-यांनी तपासणी करावी
लॉकडाऊन मध्ये शासनाची फसवणूक करून दारू दुकानदार सील तोडून खुलेआम दारू विक्री करीत आहे . तरी कर्त्यव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन वणी व पांढरकवडा येथील अबकरीचे कर्मचारी सोडून यवतमाळ येथील अधिकारी व कर्मचारी पाठवून प्रत्येक देशी दारू दुकान व बियरबार मधील साठा चेक केल्यास अनेक बार व देशी दारू दुकानाचे परवाने रद्द होऊ शकते तसेच अबकारी विभाग व दुकानदारांची मिलीभगतचा पर्दाफाश होऊ शकतो. तरी या प्रकरणाची त्वरित चौकशी व्हावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.