परवाना धारक दुकानदारांकडूनच अवैध दारूचा पुरवठा

खेड्यापाड्यात अवैधरित्या दारूचा पुरवठा

0

सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या दुकानातूनच खेडेगावात अवैधरित्या दारू पुरवठा होत असल्याचे समोर येत आहे.

तालुक्यात मुकुटबन येथे २, पाटण १, झरी १, सतपेल्ली १, मांगली १ व माथार्जुन येथे 1 असे सात देशी दारूचे परवानाधारक दुकाने आहे. यातील बहुतांश दारू दुकानातून अवैध दारू विक्रेत्यांना २५०० ते ३००० रुपये प्रमाणे दारूची पेटी विक्री केली जात आहे. ज्यामुळे झरी तालुक्यातील जास्तीत जास्त गावात अवैध दारू उपलब्ध होत असून या धंद्यात प्रचंड वाढ झाली आहे.

या दारूच्या धंद्यात अल्पवयीन मुलांपासून वयोवृद्ध माणसे गुंतली आहे. तालुक्यातील ७० टक्के जनता व्यसनाधीन झाली आहे. तर अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. पैसे कमविण्याच्या नादात तरुण युवक दारू, जुगार, सट्टा, वरली मटक्याच्या आहारी जाऊन गुंडप्रवृत्तीचे झाल्याचे दिसत आहे.

संग्रहित चित्र

तालुक्यातील अडेगाव, मार्किं, दहेगव, निमनी, घोंसा, मुकुटबन, लिंगटी, पाटण, झरी, माथार्जुन, मांडवी, वठोली, शिबला,डेमबाडदेवी, उमरी पोड, मुची, दुर्गापूर, मारोती पोड, जामनी, या गावासह अनेक गावात दारूचा पुरवठा होत असून दारू विक्री होत आहे याबत अबकारी विभाग व पोलीस विभागाने सपूर्ण माहिती असून मांजरी प्रमाणे डोळे बंद ठेऊन दूध पित आहे.

परवाना धारक दुकानदारांना नियमाने चिल्लर विक्रीचे अधिकार असताना दररोज १०० ते २०० पेट्या दारू विक्री करताहेत तसेच ५२ रुपये ५० पैसे दारूच्या शिशीचा भाव असताना ५५ ते ६० रुपये विक्री करून गोरगरीब जनतेची लूट करून लाखो रुपये कमवीत आहे. तसेच अल्पवयीन मुलांनाही दारू विकली जात आहे. दारू पिण्याचा परवाना असल्याशिवाय दारू देण्याचा अधिकार नसताना पैसे कमविण्याकरिता सर्वनाच दारूची विक्री केल्या जात आहे.

गावाची लोकसंख्ये नुसार गावातील दारूविक्री किती होतो याची माहिती अबकारी विभागाला माहीत असून सुद्धा जास्त सेल करणाऱ्या दुकानदाराला का जाब विचारला जात नाही किंवा शासकीय दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कार्यवाही करून परवाना रद्द का केला जात नाही असा संतप्त प्रश्न उपस्तीत होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.