रेतीची अवैधरित्या वाहतूक, ट्रकचालकावर गुन्हा दाखल

ट्रक कुणाचा? 2 ब्रास रेती सह ट्रक जप्त

 

विवेक तोटेवार, वणी: 12 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. लालगुडा चौफुलीवर ही कारवाई करण्यतद आली. हा ट्रक घुग्गुस येथून वणी येथे येत होता. या कारवाईत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 ब्रास वाळू सह ट्रक जप्त केला आहे. 

पोलीस पेट्रोलिंग दरम्यान 12 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास एक 6 चाकी ट्रक रेती घेऊन येतांना दिसले. या ट्रकला समोरून नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी सदर ट्रक ची पाहणी केली या ट्रकचा क्रमांक MH 29 T 2944 होता. या ट्रक मध्ये रेती असल्याचे दिसून आले.

चालक लक्ष्मण उद्धव काळे (29) रा. पूनवट याला कागदपत्रे व रेती वाहतुकीच्या परवाना बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. तसेच त्याच्याकडे रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. ट्रक मध्ये 2 ब्रास रेती जीची किंमत 15 हजार व ट्रक 6 लाख असा एकूण 6 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपी लक्ष्मण याच्यावर कलम 379, सहकलम 48 जमीन महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. सध्या रेती घाट सुरू नसल्याने अवैध रेती तस्करांनी आपले डोके वर काढण्यास सुरवात केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.