देवरावजी गव्हाने यांचे आज पहाटे निधन

दु. 11.30 वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा

पुरुषोत्तम नवघऱे, वणी: भाग्यशाली नगर येथील रहिवासी असलेले देवराव गव्हाणे यांचे आज पहाटे 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मनमिळावू स्वभावाचे धनी अशी त्यांची ओळख होती. प्रेरणा स्टुडिओचे संचालक राजू व विजय देवरावजी गव्हाणे यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी दिनांक 13 ला दुपारी स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे दुपारी 11.30 वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलं, मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

 

Comments are closed.