वणी परिसरातील दोन जण आयसोलेशनमध्ये

मुंबईतून गावी आल्याची माहिती, एकाची परिस्थिती गंभीर

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून सुरक्षीत असणा-या वणी तालुक्यासाठी ही बातमी चिंता वाढवणारी आहे. पेटूर जवळील उमरी या गावातील दोन व्यक्तींना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आल्याचे उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उ़डाली आहे. या दोन्ही व्यक्ती मुंबईहून त्यांच्या गावात आल्या होत्या. त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असून दुस-या व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणं आहेत. या दोन्ही व्यक्तींना बुधवारी यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. अद्याप रिपोर्ट आलेले नाही. लवकरच त्यांचे रिपोर्ट प्राप्त होऊ शकते.

प्राप्त माहिती नुसार उमरी (पेटूर) येथील एका कुटुंबातील चार व्यक्ती मुंबई होत्या. सध्या मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने त्या कुटुंबातील चारही व्यक्तींनी गावाकडे धाव घेतली. दिनांक 19 मे रोजी ते उमरी येथे पोहेचले. बाहेरून आल्याने त्यांना गावातील शाळेत कॉरेन्टाईन करण्यात आले. मात्र काल त्यातील एका व्यक्तीची तब्येत अचानक खालावली. त्या व्यक्तीला डोके दुखणे तसेच छातीत त्रास होणे असे कोरोनासदृश्य लक्षणं आढळले. तर दुस-या व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणं आढळली. गावातील लोकांनी याची माहिती आरोग्य विभागाला दिली.

आरोग्य विभागाने तातडीने पावलं उचलत त्यातील दोघांना दुपारी दीड ते दोनच्या सुमारास 108 क्रमांकाच्या ऍम्बुलन्सने उपचारासाठी पाठवले. त्यातील लक्षणं नसलेल्या दोन व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर लक्षणं असलेल्या दोन व्यक्तींना यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले. त्या व्यक्ती गावी परत कशा आल्या याबाबत निश्चित माहिती नसून कुणी मिळेल त्या वाहनाने तर कुणी 22 सिटर गाडीने आल्याची प्राथमिक दिली आहे.

खबरदारी घ्या, घाबरू नका…
मुंबईहून आलेल्या त्या सर्व व्यक्ती कुणाच्याही संपर्कात आले नसल्याची माहिती आहे. केवळ त्यांना टिफिन देणारी व्यक्तीच सोशल डिस्टन्सिंग राखून त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. खबरदारी म्हणून त्या व्यक्तीलाही कॉरेन्टाईन करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासन आता अलर्ट झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही अलर्ट राहणे गरजेचे आहे.

(हे पण वाचा: संपूर्ण उमरी गाव सिल. जाणून घ्या कसे आले मुंबईतून वणीत)

Leave A Reply

Your email address will not be published.