सरपंचाच्या पुढाकाराने साकारतेय ग्रा.पं.ची इमारत

शनिवारी होणार लोकार्पण सोहळा

0
वणी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत समजल्या जाणाऱ्या राजूर काॅलरी येथील ग्राम पंचायतीला इमारत नसल्याने सरपंच प्रणिता मो असलम यांनी सदस्य तसेच ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेत नवीन इमारत उभारली आहे. या इमारतीचा शनिवारी 12 ऑगस्टला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. महिला सरपंचांनी कर्तव्यात प्रामाणीक राहून राजूर काॅलरीच्या विकासात भर घालण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
तालुक्यातील मिनी इंडीया म्हणून ओळख असलेल्या राजूर काॅलरी येथे कोळसा खाण, चुना उद्योग आदी खनिज संपत्तीचे उद्योग असल्याने येथे भारताच्या कानाकोपर्यातील लोक वास्तव्यास आले आले आहे. वेकोलित कामावर आलेले लोक राजूर येथीलच रहिवासी झाले आहेत. 17 सदस्यीय संख्या असलेल्या राजूर काॅलरी तसेच इजारा येथील ग्राम पंचायतीला मालकी हक्काची इमारत नव्हती. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये कार्यालय थाटण्यात आले होते. गेली कित्येक वर्षे शाळेच्या इमारतीमध्ये ग्राम पंचायतीचे कार्यालय सुरू होते. परिणामी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्रास होवू नये यासाठी नवनिर्वाचित सरपंच प्रणिता मो. असलम यांनी पुढाकार घेत शाळेतून ग्राम पंचायतीचे कार्यालय हटवून शासकीय असलेल्या रिकाम्या इमारतीमध्ये कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. प्रसंगी गावातील काही विरोधकांनी कार्यालय हलविण्यास मज्जाव केला त्यामुळे ग्रा पं चे कार्यालय शाळेच्या इमारतीमध्ये राहीले.

राजूर ग्राम पंचायतीची विविध पक्षासोबत निगडीत असलेल्या लोकांच्या हातात सत्ता होती. परंतू आजपर्यंत ग्राम पंचायतीला हक्काची उमारत मात्र उभारण्यात कोणालाही यश आले नाही. प्रणिता मो असलम यांनी पदभार स्विकारताच प्रथम ग्राम पंचायत कार्यालयासाठी इमारत उभी करण्याचा निश्चय करत कार्याला सुरूवात केली. सोबतच राजूर गावाचा विकास करण्यासाठी कटीबघ्द असलेल्या पदविधर असलेल्या महिला सरपंचांनी कर्तव्यात कोणतीही कसर न सोडता गावातील समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, पाण्यासाठी सम खड्डा नाले सफाई, मुख्य चैकात बसण्यासाठी बाके, आदी कामे करून विकासाला सुरूवात केली आहे. ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या सदस्यांना सोबत घेवूनच गावातील विकासाला चालना देत सरपंच प्रणिता मो असलम यांनी वाटचाल सुरू करीत मनात ठरविल्याप्रमाणे ग्राम पंचायतीची नवी इमारत उभारली आहे.

14 वित्त आयोगातून गावाला नवी दिशा देण्याचे कार्य महिला सरपंच प्रणिता मो असलम यांनी केले आहे. या कार्याचा तसेच ग्रा पंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारला सकाळी 10.30 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शाम जयस्वाल, उद्घाटक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाडे, जिल्हा परिषद सदस्य संघदिप भगत व इतर मान्यवरांचे उपस्थितीत पार पडणार आहे.
राजूर गावातील सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी गावातील तसेच परिसातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.