आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात 78 वा स्वतंत्र दिन साजरा

प्रफुल्ल भोयर व परीक्षित पिंपळकर यांचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात 78 वा “स्वतंत्र दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ध्वजरोहण व वणी उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रफुल्ल भोयर व परीक्षित पिंपळकर तसेच या दोघांचे मार्गदर्शक ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक वैभव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

Podar School 2025

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष – आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी चे संचालक – रवींद्र गौरकार, प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती वैभव ठाकरे, प्रफुल्ल भोयर, परीक्षित पिंपळकर, विशेष पाहुणे उज्वला गौरकार, नितीन रामगिरवार, प्राचार्य निशांत खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जिद्द,चिकाटी,संयम व मेहनत करण्याची इच्छाशक्ती ज्या विद्यार्थ्यांनच्या अंगी असेल तर तो विद्यार्थी नेहमी यशस्वी होतो असे वैभव ठाकरे यांनी मत व्यक्त केले. सतत व सलग आठ ते दहा तास वेड्यासारखा अभ्यास करावा लागतो आणि सात्यतता असणे गरजेचे आहे परीक्षित पिंपळकर यांनी मनोगत व्यक्त केले.  शेतकऱ्याचं पोर आणि त्यात घरची परिस्थिती बिकट असून वेळ प्रसंगी भाजी पाला विकून शेतमजूरी करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि या संपूर्ण महाराष्ट्रातून मुलाखतीत टॉपर आलो, असे मनोगत प्रफुल्ल भोयर यांनी व्यक्त केले. .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम नवघरे प्रास्ताविक – निशांत खोब्रागडे आभार – प्रा. प्रिया सावरकर यांनी केले. कार्यक्र माच्या यशस्वीतेकारिता सूरज भोयर, प्रतीक चांदूरकर, रुपेश अलाम, शुभम गाणफाडे, रंजना बल्लावार, प्रणाली पत्रिवार, प्राची मोहितकर, अमित काळे, आदी नी सहकार्य केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.