संत जगन्नाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन धानोरकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला

इंडिया आघाडीची भांदेवाडा येथून प्रचारास उत्साहात सुरुवात

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील आराध्य दैवत संत जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा देवस्थानात प्रतिभा धानोरकर यांनी आशीर्वाद घेतले. तिथून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून उत्साहात सुरुवात केली. गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी राजूर येथील इंटक कामगार युनियन ऑफिसमध्ये राजूर सर्कलमधील इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी भांदेवाडा येथील जय जगन्नाथ देवस्थान येथे जाऊन इंडिया आघाडीतील स्थानिक नेत्यांनी नारळ फोडून रीतसर प्रचारास सुरुवात केली.

या वेळेस भांदेवाडा येथील काही नागरिकांशी संवाद साधण्यात आला. देशातील मूठभर भांडवलदारांना देशाची साधने अर्पण करून देशातील सार्वजनिक उद्योग भाजपचा मोदी सरकारने विकली, त्याच सोबत १९ लाख कोटी रुपयांचे भांडवलदारांचे कर्जे माफ केली, ८३ % बेरोजगारी वाढविली, महिलांवरील अत्याचारांना पाठीशी घातले, मणिपूर येथील आदिवासींवर होणारे अत्याचार थांबवण्यास मोदी सरकार अयशस्वी ठरले, लद्दाक येथील स्थानिक जनता संविधानाच्या 6 व्या अनुसूचीची अमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करीत असताना त्याला दुर्लक्ष केले, असंविधानिक निवडणूक रोख्याच्या माध्यमातून देशात बोगस लोकांना खैरात वाटून करोडो रुपयांचा निधी उकळला. कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार भाजपचा मोदी सरकारने केला आहे. भाजपने इडी, सीबीआय व आयकर ह्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भेदाभेद करून त्यांची प्रकरणे संपविली. तर ज्यांनी यांचापुढे मान झुकविली नाही, त्यांना तुरुंगात टाकले. असे अनेक आरोप इंडिया आघाडीने यावेळी केलेत.

हे सर्व मुद्दे ह्या प्रचारात घेऊन देशात मोदी सरकारच्या रूपाने असलेली हुकूमशाही संपविण्यासाठी, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या वेळेस काँग्रेसचे डॅनी सॅंड्रावार, वसुंधरा गजभिये, रमेश देवतळे, चेतन देवतळे, महादेव तेडेवार, महाकाली पामुलवार, डेव्हीड पेरकावार, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, शिवसेनेचे नितीन मिलमिले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments are closed.