विविध उद्योगांचे मोडलेत कंबरडे

तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना दिले निवेदन

0

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने युवकांसाठी वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. ते सत्तेवर विराजमान झाले. पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघू,मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणिती म्हणजे करोडो रोजगार नष्ट झाले. वस्तू सेवा कराच्या कुटीर व लघू मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे पार कंबरडे मोडले.

याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्ठ्या प्रमाणात वाढली. प्रधानमंत्री मोदी यांच्या २० लाख कोटीच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी व लघु ,मध्यम उद्योग क्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही. पंतप्रधान मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जाणून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. मोदी सरकारकडे युवकांनी *रोजगार दो… ही मागणी केली. तसे निवेदन तहसीलदार खिरेकर यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना दिले.

यावेळी वणी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन टाले, महासचिव  रोहित राऊत, झरी तालुकाध्यक्ष राहुल दांडेकर , शंकर आकुलवार, प्रदीप टेकाम, मयूर टाले उपस्थित होते..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.