विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावाहून वणीत आलेल्या एका व्यक्तीच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला. मात्र त्याचे इऩ्फेक्शन होऊन त्या जागी त्वचा लाल होऊन जखम झाल्याची घटना समोर आली आहे. याआधी होम कॉरेन्टाईनचा शिक्का दोन दिवसांत पुसला असल्याची घटना समोर आल्यानंतर आता हा शिक्याची ऍलर्जी होत असल्याचे समोर आले आहे.
वणीतील एक व्यक्ती लॉकडाऊनच्या आधी कारंजा (घाडगे) येथे त्याच्या बहिणीकडे गेला होता. मात्र लॉकडाऊनमुळे तो तिथे अडकला होता. अखेर 8 जून रोजी ती व्यक्ती वणीत परत आली. परत आलेल्या दिवशीच त्या व्यक्ती पळसोनी येथील कोविड केअर सेंटर मध्ये गेली. परंतु तेथे कुणीच नसल्याने दुसऱ्या दिवशी परत गेली. तिथे त्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली व हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला.
घरी येताच त्या शिक्क्याने त्यांच्या हातावर खाज, जळजळ सुरू झाली. त्यांच्या हाताची त्वचा ज्या ठिकाणी शिक्का मारला आहे ती जागा लाल होऊन तिथे जखम झाली आहे. शिक्याच्या इऩ्फेक्शनमुळे मात्र त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. गुरुवारी याबाबत कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करणार असल्याची माहिती त्या व्यक्तीने ‘वणी बहुगुणी’ला दिली.
आधी दोन दिवसात होम कॉरेन्टाईनचा शिक्का पुसण्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता शिक्यामुळे इन्फेक्शन होत असल्याचे समोर येत आहे.