पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वणीतील महिला व्हॉलीबॉल (बी झोन) स्पर्धेत कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाचा संघ विजेता, तर अमरावतीच्या डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा संघ उपविजेता ठरला. लोकमान्य टिळक महाविद्यालयातर्फे वणी येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन शासकीय क्रीडा मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेला क्रीडा प्रेमींनी देखील उत्तम प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (अमरावती), इंदिरा महाविद्यालय (कळंब), शिवरामजी मोघे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (केळापूर), श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय (यवतमाळ), इंदिरा गांधी कला महाविद्यालय (राळेगाव) या महाविद्यालयांच्या व्हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यानंतर विजेत्या इंदिरा महाविद्यालयाच्या संघाशी वणीच्या संस्कार क्रीडा क्बलच्या संघाने सरावाचा सामना करून आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण सोहळा झाला.
उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे, अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर, स्पर्धेचे संयोजक प्रा. उमेश व्यास हे मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत महेश भोयर, सचिन डोंगरे, फैजान खान, निखिल ठाकरे, अंकित क्षीरसागर हे पंच होते.
उद्घाटन व पारितोषिक समारंभाचे सूत्रसंचालन आणि स्पर्धेचे समालोचन डॉ. मनोज जंत्रे यांनी केले. प्रा. उमेश व्यास यांनी आभार मानले. संतोष बेलेकर, जगदीश ठावरी, रूपेश पिंपळकर, सुरज कडूकर, प्रा. राजेंद्र कोठारी, डॉ. गुलशन कुथे, प्रा. महादेव भुजाडे, प्रा. आनंद हूड, प्रा. आदित्य शेंडे, पंकज सोनटक्के, जयंत त्रिवेदी यांच्यासह संस्कार क्रीडा मंडळ आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयातील खेळाडू, राष्ट्रीय छात्रसैनिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
Comments are closed.