झरी आयटीआयच्या शिक्षकांचं चुकतंय की विद्यार्थ्यांचं!

एकमेकांवरील आरोपांचं खंडण-मंडण, तहसिलदारांकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिनियर वायरमन ट्रेंडचे शिक्षक पंकज डांगे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप विदयार्थ्यांनी केला. विद्यार्थी त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याची तक्रार देऊन सदर शिक्षकाला केंद्रातून त्वरित काढण्याची मागणी केली आहे. शिक्षक डांगे हे प्रशिक्षण केंद्रावर वेळेवर कधीच येत नाही, प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यापासून एकही क्लास (लेक्चर) घेतला नाही.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरातील वयक्तिक कामे करायला लावतात. वर्गात येऊन कधीच शिकवत नाही. तसेच शिकवायला या म्हटल्यास धमकाऊन गप्प बसण्यास सांगतात. मानसिक व शारिरीक त्रास देतात व माझी तक्रार कुठे केली तर तुमची कागदपत्रे देणार नाही असे धमकवतात, अशी तक्रार तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांची कागदपत्रे काढून देण्याची तसेच शिक्षक पंकज डांगे यांना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून त्वरित बाहेर काढण्याची मागणी केली. आमच्या जिवास काही झाल्यास त्याला जवाबदार डांगे असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. निवेदन देते वेळी सौरव मुके, अंकुश राऊत, रोशन निखाडे, परमेश्वर लांडगे, कल्याणी चामाटे, साक्षी मनवर, अविनाश कावळे, राहुल राठोड, अजय पेटकर, सुजित जुनघरे, इर्शाद शेख, स्वप्नील ठाकरे, निखील मालेकर, देवीदास लोखंडे, सूरज उदकवर, शंकर मोहितकर, सुचिता सोयाम, राहुल गोडे, सूरज ढोके, घनश्याम तेलंग,अक्षय वानखेडेसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य म्हणतात, हे आरोप बिनबुडाचे, बेशिस्त विद्यार्थ्यांची ही सूडभावना

गेल्या अनेक महिन्यापासून प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणकरिता व कोणतेही क्लाससाठी हजर राहत नव्हते हा प्रकार वरीष्ठ पासून तर लोकप्रतिनिधी पर्यंत माहीत होते .कोणत्याही वरिष्ठांची संस्थेला भेट झाली की विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसायची त्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत आम्हीच दोषी दिसत होते.ज्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्व विद्यार्थाना प्रशिक्षण घेण्याकरीता यावेच लागेल अशी भूमिका घेतल्यामुळे विद्यर्थाना बुट्टी मारणे बंद झाले ज्यामुळे विद्यर्थाना आमच्या विषयी राग निर्माण झाला.प्रशिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी क्लासमध्ये मोबाईलवर पबजी गेम खेळतात,शिक्षकांना जुमानत नाही,अभ्यास करीत नाही.

७ ऑगस्ट ला या विद्यर्थांचा पेपर होता त्या पेपर मध्ये एकाही विद्यार्थ्यांना कॉपी करू दिली नाही ज्यामुळे विद्यर्थाना राग आला व काही विद्यार्थ्यांनी क्लास मध्ये खर्रा खाऊन दरवाज्याजवळ व ब्लॅक बोर्डजवळ सुद्धा थुंकल्याचे सांगण्यात आले.पेपर खराब गेल्याने आपण नापास होतो या रागाने व क्लास नियमि केल्याने विद्यर्थानी खोटी तक्रार दिली.——-प्राचार्य संजय तेलतुंबडे

Leave A Reply

Your email address will not be published.