आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनीला भरावा लागणार नगर परिषदेचा कर
पी के टोंगे यांच्या प्रयत्नाला येणार यश
विवेक तोटेवार, वणी: आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनी करंजी वणी व घुग्गुस चंद्रपूर रोडवर पथकर वसुलीचे काम करते. या ठिकाणी कंपनीने कोणतेही कागदपत्रे किंवा नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम करून कार्यालय बांधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीने ग्रामपंचायत कर किंवा नगर परिषदेच्या कराचा भरणा केलेला नाही. पी के टोंगे यांनी मुख्याधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करून सदर कंपनीने थकीत कराचा भरणा करावा याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार आता आय. व्ही. आर. सी. एल. टोलवेज कंपनीला भरावा लागणार नगर परिषदेचा कर भरावा लागणार आहे.
कंपनीने कोठोड, वणी व धानोरा फाटा येथे पथकर नाके व कार्यालयाचे बांधकाम केले आहे. परंतु कंपनीने याबाबत ग्रामपंचायत किंवा वणी नगर परिषदेत कोनेतेही कागदपत्र सादर केले नाही किंवा बांधकाम परवानगी घेतली नाही. धानोरा येथे कंपनीला 42609 व कोठेडा ग्रामपंचायतीद्वारा 57000 रुपयांचा कर पावती नोटीस दिली आहे. कंपनीने मुजोरी करीत येथील कर भरणा केला नाही. शिवाय वणी नगर परिषदेकडून सुध्दा 41 लाख 49 हजार 974 रुपयांची कर भरण्याबाबत नोटीस दिली आहे.
सदर रक्कम शासन भरणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या प्रकारणाबाबत पी के टोंगे यांना मुख्याधिकारी यांच्या मार्फत थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत धाव घ्यावी लागली. त्यांनीही कंपनीने कर भरणा करावा असा आदेश दिला. परंतु मुजोर कंपनीने अजूनही कराचा भरणा केलेला नाही.
याबाबत पी के टोंगे यांनी कंपनीला काही प्रश्न उपस्थित केले आहे. ज्यामध्ये मालमत्ता ही शासनाची असल्यास व शासनाच्या जागेवर बांधकाम असल्यास कर शासन भरेल. परंतु नगर परिषद हद्दीतील जागा जर कंपनी वापरात असेल व त्यावर बांधकाम करीत असेल तर कर भरण्याची जबाबदारी ही पूर्णपणे कंपनीची आहे.
प्रश्न उपस्थित करीत सदर कंपनीबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांना तक्रार दिली आहे. कराचा भरणा न केल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बांधकाम हटविण्याचा सुद्धा निर्णय येऊ शकतो. यावर कंपनी आता कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे.