आज संध्याकाळी 7 वा रामपुरा वार्ड येथे जगराता

नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी:आज शुक्रवारी संध्याकाळी 7 वा. वणीतील जत्रारोड वरील रामपुरा वार्ड जगरात्याचे आयोजन करण्यात आले आहे.  काळाराम मंदिरासमोर हा जगराता होणार आहे. श्री काळाराम दुर्गा उत्सव मंडळ व श्रीरामपूरा दुर्गा उत्सव मंडळ वणी. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळाच्यावतीने घटस्थापनेपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. दररोज महाआरतीचे आयोजन करून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांना आरतीचा मान देत त्याना स्वागत, सन्मान केला गेला. यात संजय खाडे, विजय चोरडिया, प्रा. टीकाराम कोंगरे, वणी पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी आदी मान्यवरांनी उपस्थित लावली आहे. सार्वजनिक उत्सव सर्वांच्या सोबतीने केला जातोय याचे उदाहरण श्री काळाराम दुर्गा उत्सव मंडळात बघायला मिळत आहे. दिनांक 8 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजता शिवकालीन शास्त्रविद्येचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शिवाआनंद लाठीकाठी ग्रुपच्या वतीने तेजस्विनी राजू गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. आज होणा-या जगरात्याला मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.