पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक आधार

जागृत पत्रकार संघाकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

0

विवेक तोटेवार, वणी: 6 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या जन्मदिनाला पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु या पत्रकार दिनी जागृत पत्रकार संघाद्वारे आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले पत्रकार रमेश पाटील यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदतीचा हाथ देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

रविवारी 6 जानेवारी ला वणीतील शासकीय विश्रामगृहात जागृत पत्रकार संघाद्वारे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे पत्रकारितेत आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारे रमेश पाटील यांचा काही दिवसांगोदार अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयाचे आर्थिक आधारच हिरावून घेतला. या सर्व परिस्थितीची जाणीव ठेवून इतर खर्च करण्यापेक्षा पाटील यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी व मुलींना रोख रक्कम देऊन जागृत पत्रकार संघाद्वारे सामाजिक भान राखल्या गेले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार जयंत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धावांजेवार व जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर मंचावर उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष परशुराम पोटे, सचिव मोहमद मुस्तक व  सदस्य महादेव दोडके, दीपक छाजेड, प्रवीण शर्मा, विवेक तोटेवार, सुरेंद्र बोथरा, सागर मुने, तोषिक झिलपे, रवी कोटावार, आकाश दुबे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सागर मुने यांनी तर उपस्थितांचे आभार परशुराम पोटे यांनी मानले. यावेळी रमेश पाटील यांची पत्नी दुर्गा व मुलींना रोख रक्कम व साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.