अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार- राजेंद्र जयस्वाल
जयस्वाल सभेच्या कार्यक्रमात नवीन कार्यकारणी घोषित
बहुगुणी डेस्क, वणी: मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाज आहे म्हणून मनुष्य आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक माणसावर फार मोठी जबाबदारी आहे. जयस्वाल समाजाचा घटक म्हणून आता माझी ही जबाबदारी वाढली आहे. मी अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे. असे प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जयस्वाल यांनी केले.
ते जयस्वाल सभेच्या वणी, मारेगाव, झरी जामणी विशेष सभेच्या प्रसंगी बोलत होते. या सभेत राजेंद्र जयस्वाल यांची समाजाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अतुल जयस्वाल यांची निवड करण्यात आली. ही सभा स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झाली.
या सभेला वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव, झरी जामणी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदग्रहण सोहळा झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत दिनेश जयस्वाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Comments are closed.