बहुगुणी डेस्क, वणी: शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट व रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी निमित्त वणीकरांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्या. 7 वा. श्री विनायक मंगल कार्यालय येथे सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन व मिमिक्री आर्टिस्ट प्रा. महेंद्र गणपुले यांचा हास्यनगरी हा एकपात्री नाट्य प्रयोग झाला. महेंद्र गणपुले यांच्या विविध विनोदाने व मिमिक्रीने एकच धम्माल उडवली. आज शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संध्या 6 वा. श्री विनायक मंगल कार्यालय येथे सुप्रसिद्ध नाटककार जयवंत दळवी लिखित ‘संध्याछाया’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे. स्पर्धेत व नाटकाच्या प्रयोगाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ऍड कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.
आज कोणत्या स्पर्धा?
शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट अमृत भवन येथे दु. 2 वा. बाल कृष्ण दर्शन (कृष्ण व महाभारतातील पात्र) ही वेशभूषा स्पर्धा होणार आहे. दु. 3 वाजता डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कृष्ण झुला, कृष्ण मटकी सजावट हा विषय आहे. दु. 4 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा वर्ष 1 ते 6, वर्ष 7 ते 11 व वर्ष 12 ते 18 अशा तीन वयोगटात होणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी राजू रिंगोले, ख्याती चोरडिया, विद्या मुथा यांना संपर्क साधता येणार आहे.
हास्यनगरीने उडवली धमाल
महाराष्ट्रातील नामवंत मिमिक्री आर्टिस्ट व स्टॅन्डअप कॉमेडियन प्रा. महेंद्र गणपुले यांच्या हास्यनगरी या कार्यक्रमाने एकच धमाल उडवून दिली. यावेळी त्यांनी सांगितलेल्या एकसे एक धमाल किस्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. यावेळी त्यांनी केलेल्या कुत्र्यांच्या भांडणाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.
चुकवू नये अशी ‘संध्याछाया’
आज संध्याकाळी 6 वाजता श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्याछाया या 2 अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे. संध्याछाया हे जयवंत दळवी याचे एक प्रसिद्ध नाटक आहे. एका दांपत्याचा एक मुलगा लष्करात, तर दुसरा मुलगा परदेशी नोकरीला असतो. परदेशातील मुलगा आई-वडिलांना न सांगता लग्न करतो, आठ-दहा वर्षे तो घरी परत येत नाही. परततो पण केवळ भेटायला, तर दुसर्या मुलाचा मृत्यू होतो. अशी या नाटकाची थिम आहे. पुढे या नाटकात काय होते हे प्रेक्षकांना नाटकात अनुभवायला मिळणार आहे. या नाटकात दीपाली भट व प्रफुल्ल भाटेगावकर यांची प्रमुख भूमिका आहे. तर रमेश लखमापुरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
Comments are closed.